महत्वाच्या बातम्या

 इनर व्हील क्लब गडचिरोलीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : इनर व्हील क्लब गडचिरोलीच्या वतीने सन २०२६-२०२७ या वर्षासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व स्थापना सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, धानोरा रोड, गडचिरोली येथे आयोजित या कार्यक्रमाला महिला पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात शिल्पा हेमके यांनी इनर व्हील क्लबच्या अध्यक्षपदाची, तर शालू भुसारे यांनी सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्यासह सन २०२६-२७ साठी नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी बोलताना शिल्पा गव्हारे नवनियुक्त अध्यक्षा इनर व्हील क्लब गडचिरोली यांनी इनर व्हील क्लबच्या माध्यमातून महिलांनी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत गरजू घटकांसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन केले. महिला ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून समाजाच्या परिवर्तनाचीही महत्त्वपूर्ण शक्ती आहे. महिलांनी एकत्र येऊन सेवा, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाच्या माध्यमातून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्या रघुसे, जिल्हा व्हॉइस चेअरमन, इनर व्हील क्लब, उपस्थित होत्या. तसेच माजी अध्यक्ष वैशाली बट्टुवार, माजी सचिव सरस्वती पारतानी आणि प्रोजेक्ट डायरेक्टर दिपाली काथवटे, योगिता पिपरे सदस्य इनर व्हील क्लब, जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा तथा नगरसेविका (माजी नगराध्यक्ष) नप गडचिरोली यांची उपस्थिती होती.

इनर व्हील क्लबच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

नवीन कार्यकारिणीने आगामी वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून Together We Shine, Together We Serve, Together We Lead या ब्रीदवाक्याला सार्थ ठरविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इनर व्हील क्लब गडचिरोलीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन करून आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos