माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टेनिस बाॅल क्रिकेट सामन्यांचे उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील कांदोळी येथील जय कुपार लिंगो क्रिकेट क्लब यांच्या द्वारे टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
हा क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. तर द्वितीय इरपाजी के. आत्राम कडून देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत कोंदोळी कडून देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून झुरु मडावी सरपंच ग्रामपंचायत कांदोळी व रामजी डोबी मडावी पोलीस पाटील कांदोळी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नदु मट्टामी तालुका ग्रामसभा अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघटन एटापल्ली होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी आणि इरपा आत्राम होते. दिपप्रज्वलन म्हणून कोंदोळीचे माजी पोलीस पाटील मल्लू मडावी होते.
यावेळी डोलेश मडावी, प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली, सुकरम मडावी माजी सभापती भामरागड, सुरु मडावी सरपंच, कांडे मडावी पो.पाटील, रामा मडावी गाव पाटील, मलु मडावी माजी पो. पाटील, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, साजन गावडे माजी उपसरपंच तथा सदस्य पेरमेली, लिंगा वेलांदी माजी सरपंच रेगुळवाही, कवीश्वर चांदनखेडे, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, प्रमोद गोडसेलवार, सचिन पांचार्या सह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli