महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२ जून महत्वाच्या घटना

१८०० : कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.

१८९६ : गुग्लियेमो मार्कोनीला रेडिअोसाठी पेटंट बहाल.

१८९७ : आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.

१९४६ : राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

१९४९ : दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१९५३ : इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.

१९७९ : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९९९ : भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.

२००० : लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.

२०१४ : तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.

२०२२ : तुर्की / तुर्किये - देशाने तुर्की हे नाव अधिकृतपणे बदलून तुर्किये असे ठेवले.

२००३ : मार्स एक्सप्रेस - युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोब प्रक्षेपित, युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर जाण्याचा पहिला प्रवास सुरू केला.

१९६६ : सर्वअर प्रोग्राम - सर्वेअर 1 चंद्रावर उतरले, दुसऱ्या जगावर सॉफ्ट-लँड करणारे पहिलेअमेरिकन स्पेसक्राफ्ट बनले.

१९६४ : पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) - स्थापना झाली.

१९२४ : भारतीय नागरिकत्व कायदा, अमेरिका - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी भारतीय नागरिकत्व कायद मंजूर केला आणि अमेरिकेच्या प्रादेशिक मर्यादेत जन्मलेल्या सर्व मूळ अमेरिकन लोकांना नागरिकत्व दिले.

१९१० : चार्ल्स रोल्स - विमानाने इंग्रजी चॅनेल न थांबता २ वेळा पार करणारे पहिले व्यक्ती आहेत.

१९०९ : अल्फ्रेड डीकिन - तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले.

२ जून जन्म

१७३१ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८०२)

१८४० : इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९२८)

१९०७ : मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.

१९३० : अमेरिकन अंतराळवीर पीट कॉनराड यांचा जन्म.

१९४३ : भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.

१९५५ : इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.

१९५५ : चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.

१९६३ : अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१२)

१९६५ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मार्क वॉ यांचा जन्म.

१९६५ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू स्टीव्ह वॉ यांचा जन्म.

१९७४ : अमेरिकन बुद्धीबळपटू गाटा काम्स्की यांचा जन्म.

१९८७ : भारतीय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा जन्म

१९३६ : भारतीय पोलाद उद्योगपती, टाटा स्टीलचे संचालक - पद्म भूषण जमशेद जीजी इराणी यांचा जन्म (मृत्यू : ३१ ऑक्टोबर २०२२)

२ जून मृत्यू

१८८२ : इटलीचा क्रांतिकारी ज्युसेप्पे गॅरिबाल्डी यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८०७)

१९७५ : वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)

१९८८ : भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९२४)

१९९० : ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९०८)

१९९२ : मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १९३४)

२०१४ : भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)

२०२२ : भारतीय संतूर वादक भजन सोपोरी यांचे निधन

२०१४ : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते अंजन दास यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १९४९)

१९९० : भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचे निधन (जन्म: २० सप्टेंबर १९११)

१९८७ : भारतीय-अमेरिकन धर्मगुरू आणि मानसोपचारतज्ज्ञ अँथनी डी मेलो यांचे निधन (जन्म: ४ सप्टेंबर १९३१)

१९७० : मॅक्लारेन रेसिंग टीमचे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचे निधन (जन्म: ३० ऑगस्ट १९३७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos