माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची येल्लाम्मा बोनालू कार्यक्रमाला उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील दामरंचा येथील दरवर्षी येल्लाम्मा बोनालू कार्यक्रम आयोजित केली जाते. या वर्षी सुद्धा येथील येल्लाम्मा बोनालू मोठ्या उत्सहात पार पाडले आहे. या येल्लाम्मा बोनालूला आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी उपस्थित राहून येल्लाम्मा देवीला विविध पूजा अर्चना- आरती देऊन दर्शन घेतले.
यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे, अशी येल्लाम्मा देवीकडे प्रार्थना केली.
यावेळी दामरंचा ग्रामपंचायतचे सरपंच किरण प्रमोद कोडापे, संदीप डोलगे, मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी, कवडू चल्लावर, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, सुधाकर टिम्मा, सचिन पंचर्या, चिंटू, दिवाकर तलांडी, विनोद दुग्गालवार, प्रमोद कोडापे, भास्कर कोडापे, शिव वेलदी, गुरूदास सडमेक, श्रीनिवास कोडापे, जिलकर मडावी, सुधाकर मडावी, चिन्ना मडावीसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक- भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli