महत्वाच्या बातम्या

 २१ फेब्रुवारीला धानोरा तालुका कार्यकारिणीची बैठक : आमदार डॉक्टर देवराव होळी 


- अपेक्षित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे आवाहन
- दुपारी १ वाजता राजीव भवन रांगी येथे बैठकीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : उद्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता राजीव भवन रांगी येथे भारतीय जनता पार्टीच्या धानोरा तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अपेक्षित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले आहे.

बैठकीला भाजपा तालुका कार्यकारणी सर्व पदाधिकारी व सदस्य, सर्व आघाड्यांचे तालुक्याचे पदाधिकारी, तालुक्यातील जिल्ह्याचे, प्रदेशाचे, प्रमुख पदाधिकारी, तालुक्यातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जेष्ठ नेते, अपेक्षित असून उपस्थिती १००% राहील याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेऊन बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे व येताना आपले मतदानाचे ओळखपत्र सोबत आणावे असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos