पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षल्यांनी दिली कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षल्यांनी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आहे.सात दिवसांपूर्वी धमकीचे पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले असून अधिकाऱ्यांच्या जीवालाही धोका आहे. यासंबधीची तक्रार ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आल्याची माहिती गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
मंत्री एकनाथ शिंदे यांना ७ दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले. त्यासंबधीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. नक्षल्यांकडून मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात त्यांच्यासह कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी किंवा जिवघेणा हल्ला होऊ शकतो अशी धमकी देण्यात आली आहे.
मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील काही परिसर नक्षलग्रस्त भागात मोडतो. जिल्ह्यात शिंदे यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात मुलभूत सुविधा वाढवण्यात आल्या. पक्क्या रस्त्यांची तसेच इतर विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
जिल्हातील नक्षल्यांच्या उपद्रवामुळे बंद झालेले काही Mining projects मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरू केले. त्याचा राग नक्षल्यांमध्ये आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नक्षलग्रस्त परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा सुरू करण्यात आल्या.त्यामुळे स्थानिकांकडून नक्षल्यांचे समर्थन कमी होत असल्याचे दिसून येत होते.
एवढेच नाही तर २५ हून अधिक नक्षल्यांनी सरकार समोर समर्पन केलं होतं. त्यासाठीही १० कोटींची विशेष योजना मंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवली होती.



  Print






News - Rajy | Posted : 2021-10-29




Related Photos