आदिवासी समाजाचे हित जोपासणारे केंद्र सरकार : खासदार अशोक नेते
- भव्य आदिवासी समाज मेळावा माता अनुसया सेलिब्रेशन हॉल नालवाडी वर्धा येथे संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आदिवासी समाजाचे कुंवार भिमसैन व हनुमान जयंती या निमित्याचे औचित्य साधुन भव्य आदिवासी समाज मेळावा आज २३ एप्रिल २०२४ रोज मंगळवार ला माता अनुसया सेलिब्रेशन हॉल नालवाडी वर्धा जि. वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार अशोक नेते यांचे हस्ते आदिवासी समाज दैवतांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आले.
या आदिवासी समाज मेळाव्याच्या कार्यक्रमाला उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी संबोधित करतांना म्हणाले, आदिवासी समाज एकसंघाने एकत्रित येऊन सामाजिक लढा दिला पाहिजे. आदिवासी समाजाचे हित जोपासत समाजाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून हया समाजाच्या विकासासाठी शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वित करून अंमलात आणले आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आपल्या स्तरावर प्रयत्नशील कार्य करित आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी म्हणून द्रोपदी मुर्मू यांना विराजमान केल्या यात मौलाचा व सिंहाचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाजाला मिळालेला हा बहुमान आहे. आदिवासी समाजासाठी शासन राबवित असलेल्या केंद्र शासनाची माहीती देत केंद्र सरकार सुद्धा समाजाच्या हितासाठी व विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते, प्रदेश महामंत्री आदिवासी मोर्चाचे नितिन मडावी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, शंकर आत्राम, नीता गजाम, सरस्वती मडावी, भारत कोवे, नलिनी सयाम, राजु मडावी, अक्षय उईके, प्रल्हाद पोयाम, शारदा तुमडाम, पद्मा कोडापे, अर्चना उईके, विठ्ठलराव घडीनकर, किसन वाघमारे, ताराचंद दुर्वे तसेच मोठ्या संख्येने आदिवासी समाज बंधू भगिनीं बांधव उपस्थित होते.
News - Wardha