धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम होणे गरजेचे : खासदार अशोक नेते


- मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन ता. देवरी जि. गोंदिया येथे आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (देवरी) : परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन देवरी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदानेे, विशाल जनसमुदायाच्या अनुयायानी आयोजित करण्यात आला होता.
परमात्मा एक सेवक या कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन धार्मिक व अध्यात्मिक मार्गदर्शन करतांना परमात्मा एक सेवक या अंतर्गत, दुःखी कष्टी व अज्ञानी मानवास भगवंत प्राप्तीचा निष्काम भावनेने परिचय करत सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे वाईट व्यसन, अंधश्रद्धा, यापासून परावृत्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या शिकवणी प्रमाणे जनजागृती करित मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अशा धार्मिक, अध्यात्मिक, कार्यामुळे आचार विचार आणि संस्काराची निर्मिती होते, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी परमात्मा एक या कार्यक्रमाप्रसंगी केले.
यावेळी मंचावर प्रविण दहिकर तालुका अध्यक्ष भाजपा देवरी, संजू ऊईके अध्यक्ष नगर पंचायत, नितेश वालोदे अध्यक्ष युवा मोर्चा, देवराव चुटे व इतर मोठया संख्येने परमात्मा एक सेवक चे सदस्य गण, नागरिक बंधू आणि भगिनी मान्यवर उपस्थित होते.
News - Gondia