महत्वाच्या बातम्या

 लोकमान्य विद्यालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : शहर स्वच्छ ठेवण्याचे काम अविरतपणे करणाऱ्या आणि समाजाचे आरोग्य जपणाऱ्या वरोरा नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार लोकमान्य विद्यालयातर्फे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य राहुल राखे तर मंचावर न प चे स्वच्छता विभाग प्रमुख भूषण सालवटकर,  पाणीपुरवठा सभापती गजानन जीवतोडे,  उपमुख्याध्यापक दीपक नवले व पर्यवेक्षक डॉ. प्रशांत खुळे यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करीत, ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या कचराकुंडी टाकावा. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन भूषण सालवटकर यांनी केले. टाकाऊ कचऱ्यापासून खत निर्मिती होत असल्याचे सांगत कचऱ्याची नीट विल्हेवाट लावावी असे ते म्हणाले. गजानन जीवतोडे यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान तसेच विद्यार्थ्यांना क्षमप्रतिष्ठा बद्दलची जाणीव करून देणाऱ्या कार्यक्रमाची स्तुती केली. दीपक नवले आणि राहुल राखे यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. 

यावेळी नगरपरिषद चे स्वच्छता कर्मचारी सुनील पवार,  राहुल लंगोटे, नीलू बरसे, पूजा नरपांडे, विजय दानव आदींचा सन्मान शाल,  श्रीफळ, सन्मानपत्र व मिठाई देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत खुळे यांनी केले. संचालन  महेश मोरे तर आभार अमोल सालवटकर यांनी मानले.





  Print






Related Photos