विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : दुचाकीची रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ४० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोसाईटोला ते सरकारटोला मार्गावर मंगळवारी ३ सायंकाळी ७ वाजतापासून ते बुधवारी ४ पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. ईश्वरदास भरत मांडवे (४०, रा. मरारटोला) असे मृत युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, ईश्वरदास मांडवे हे गोसाईटोला ते सरकारटोला दरम्यानच्या मार्गावर गेले असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला जोरदार धडक बसल्याने ते रस्त्यालगत पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या धानाच्या बांधीत जाऊन पडली होती.

दरम्यान, ईश्वरदास हे गोसाईटोला ते सरकारटोला मार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेले असल्याची माहिती त्यांचे वडील भरत धोंडू मांडवे (६७, रा. मरारटोला, ता. आमगाव) यांना मिळाली. त्यांनी जावयासोबत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर ईश्वरदास हे सिमेंटच्या खांबाजवळ पडलेले दिसून आले. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता, तर दुचाकी जवळच धानाच्या बांधीत पडून असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेप्रकरणी भरत मांडवे यांनी आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुचाकी वीज खांबाला धडकून झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

" /> विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

"/>
महत्वाच्या बातम्या

 वीज खांबाला दुचाकीची धडक : ४० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

- गोसाईटोला-सरकारटोला मार्गावरील अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, दुचाकी धानाच्या बांधीत आढळली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : दुचाकीची रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ४० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोसाईटोला ते सरकारटोला मार्गावर मंगळवारी ३ सायंकाळी ७ वाजतापासून ते बुधवारी ४ पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. ईश्वरदास भरत मांडवे (४०, रा. मरारटोला) असे मृत युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, ईश्वरदास मांडवे हे गोसाईटोला ते सरकारटोला दरम्यानच्या मार्गावर गेले असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला जोरदार धडक बसल्याने ते रस्त्यालगत पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या धानाच्या बांधीत जाऊन पडली होती.

दरम्यान, ईश्वरदास हे गोसाईटोला ते सरकारटोला मार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेले असल्याची माहिती त्यांचे वडील भरत धोंडू मांडवे (६७, रा. मरारटोला, ता. आमगाव) यांना मिळाली. त्यांनी जावयासोबत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर ईश्वरदास हे सिमेंटच्या खांबाजवळ पडलेले दिसून आले. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता, तर दुचाकी जवळच धानाच्या बांधीत पडून असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेप्रकरणी भरत मांडवे यांनी आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुचाकी वीज खांबाला धडकून झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

  Print

Related Photos