नैसर्गिक शेती कार्यशाळा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, रोटरी क्लब गांधी सिटीच्या संयुक्त विद्यमाने चरखागृह येथे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख प्रमुख मार्गदर्शक म्हणुन टू ब्रदर्स पूणेचे अध्यक्ष सत्यजित होगे, नैसर्गिक शेती प्रयोशील शेतकरी पद्श्री सुभाष शर्मा उपस्थित होते.
कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक अरविंद उपरीकर, उपसंचालक राणी गायकवाड, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी रोहण झांजरे, रोटरी क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष संदीप कदम, सचिव मनोज मेहता, श्रीकांत राठी, आश्रय किसानचे अविराज राठी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच रोटरी क्लबचे सर्व रोटेरियन उपस्थित होते.
सत्यजित होगे यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन करतांना पारंपारिक ज्ञानाची योग्य सांगड घातली तर शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग न राहता एक जागतिक स्तरावरील यशस्वी व्यवसाय बनू शकतो, असे सांगितले.
अविराज राठी यांनी पारंपारिक पद्धतीतील पिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून अश्वगंधा व चिया पीक प्रात्यक्षिकाकडे बघितले पाहिजे जेणेकरून शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नवीन पीक पद्धतीचा वापर करणे काळाची गरज झालेली आहे, असे सांगितले. याकरिता आश्रय किसान संस्था कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याना मार्गदर्शन करतात याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात सुभाष शर्मा यांनी मी गेल्या ३० वर्षाहून अधिक काळापासून रासायनिक खते आणि जंतुनाशकांचा वापर पुर्णपणे बंद करुन नैसर्गिक पध्दतीने शेती करत असल्याचे सांगून मातीची सुपीकता टिकवून, पाण्याचा योग्य वापर करुन पर्यावरणपूरक शेती कशी करावी, याचे मॉडेल त्यांनी विकसित केले आहे.
एकाच प्रकारच्या पिकावर अवलंबून न राहता शेतीमध्ये विविध पिकांची लागवड करुन बहूपिक पध्दतीचा वापर करावा, असे सांगितले. कार्यशाळेला जिल्ह्यातील सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती करणारे ८०० शेतकरी उपस्थित होते, असे कृषि विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.




Petrol Price




