महत्वाच्या बातम्या

 माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची करण कोठारी ज्वेलर्स’च्या प्रदर्शनाला सदिच्छा भेट : संचालकांकडून स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नागपूर येथील प्रसिद्ध करण कोठारी ज्वेलर्सच्या वतीने गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सुवर्ण, हिरे आणि पोलकी दागिन्यांच्या प्रदर्शनाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट दिली. येथील मुल रोडवरील हॉटेल जिंजर येथे ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवशीय भव्य प्रदर्शचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाला भेट देऊन डॉ. अशोक नेते यांनी प्रदर्शनातील नवनवीन डिझाइन्स, गोल्ड, डायमंड व पोलकी दागिन्यांच्या विविध संग्रहाची अत्यंत बारकाईने पाहणी केली व या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रदर्शनाला भेट दिल्याप्रसंगी करण कोठारी ज्वेलर्सच्या संचालकांच्या वतीने माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना डॉ. नेते यांनी, गडचिरोलीतील नागरिकांना एकाच छताखाली जागतिक दर्जाचे, शुद्ध आणि नवनवीन डिझाइन्सचे दागिने उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे उपक्रम स्तुत्य आहे, असे सांगत कौतुक केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान नगरसेवक सागर निंबोडकर, करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक कौशल व्यास, मॅनेजर अनुप कुमार, सेल्स मॅनेजर रवी रंजन, संजय बारापात्रे, रवी मेश्राम,रुषीकेश बारापात्रे, यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos