तालिबान्यांची भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये घुसखोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / काबूल :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या संघर्षानंतर अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा मिळवला आहे. घराघरात घुसून अफगाणी नागरिक-सैनिकांची झाडाझडती केली जात आहे. दरम्यान एवढ्यावरच हे तालिबानी थांबले नसून त्यांनी कंधार आणि हेरातमध्ये बंद पडलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये घुसखोरी केली आहे. त्यांनी टाळे तोडून या दूतावासात घुसखोरी केली असून याठिकाणी असणाऱ्या कपाटांमध्ये काही कागदपत्रांचा शोध घेतला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या एका अहवालानुसार, तालिबानी या दूतावास परिसरात पार्क केलेल्या गाड्यांना देखील घेऊन गेले आहेत. शिवाय काबूलमध्ये घराघरात घुसून ते NDS साठी काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांची ओळख पटवत आहेत आणि त्यांच्याकडे झाडाझडती करत आहेत.
NDS ही अफगाणिस्तानमधील गुप्तचर एजन्सी आहे. जलालाबाद आणि काबूलमधील भारतीय दूतावासांमध्ये तालिबान्यांकडून काय केले जात आहे याबाबत अद्याप अपडेट समोर आलेले नाही. कंधारमधील अहवालानुसार अशी माहिती मिळते आहे की तालिबान कॅडरने भारतीय वाणिज्य दूतावासाचं टाळं तोडलं आहे त्यांनी झाडाझडती घेतली. त्यांनी त्याठिकाणी पार्क करण्यात आलेले वाहनही सोबत नेले आह. हेरातमध्येही त्यांनी वाणिज्य दूतावास परिसरात प्रवेश केला, याठिकाणी जबरदस्तीने वाणिज्य दूतावासात न घुसता जाताना वाहने घेऊन गेले आहेत.  Print


News - World | Posted : 2021-08-20
Related Photos