वैनगंगा नदीच्या पुलावरून युवकाने घेतली उडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचिरोली मुख्य महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर उभा राहून एका युवकाने नदी उडी मारल्याची खळबळजनक घटना काही वेळापूर्वीच घडली आहे. बंडू सुधाकर हजारे रा. अंतरगाव ता. सावली जिल्हा चंद्रपूर येथील युवक आहे. उडी मारण्याचे कारण अद्याप समजले नाही. याबाबत सावली पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी बघणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे
News - Chandrapur | Posted : 2021-09-10