आलेंगा माल येथे माता मंदिर तर टोला येथे सिमेंट रस्त्याचे होणार बांधकाम
- माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आलेंगा माल येथील माता मंदिर तर आलेंगा टोला येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
गावात माता मंदिर बांधकाम करण्यात यावा म्हणून गावकऱ्यांनी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडे मागणी केली होती. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता त्वरित निधी मंजूर करून दिल्याने गावकऱ्यांनी भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले. तर आलेंगा टोला येथील नागरिकांना पक्का रस्ता अभावी पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे लक्षात येताच नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी स्वतः भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेऊन येथे सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी निधी खेचून आणली. नुकतेच आलेंगा माल येथे माता मंदिर तर आलेंगा टोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी भूमिपूजन केले.
यावेळी माजी प.स. सभापती बेबी नरोटी, राकॉचे कार्याध्यक्ष संभा हिचामी, येमलीचे सरपंच ललिता मडावी, लक्ष्मण नरोटी, नगरपंचायतचे गट नेता जितेंद्र टिकले, ग्रा.प. सदस्य रैजू गावडे, गणेश धुर्वा, माजी सरपंच बिरजू मट्टामी, माजी उप सरपंच भिवाजी मट्टामी, पोलीस पाटील नानसू मट्टामी, भूमिया दुलसा मट्टामी आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli