महत्वाच्या बातम्या

 टॅब मिळाल्याने अभ्यास होणार सुकर : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


- टॅब वाटप विदयार्थ्याची भावना.... 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आता टॅब मिळाला... महाज्योतीने दिलेल्या टॅबने अभ्यासाला आता गती येईल.. अश्या भावना विदयार्थ्यानी व्यक्त केल्या. प्रसंग होता जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महा ज्योती तर्फे टॅब वाटप. 

सामाजिक न्याय सभागृहात रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह सहायक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 893 टॅबचे वाटप करण्यात आले. महाज्योतीने विद्यार्थ्यांना याबाबत एसएमएसव्दारे कळविले होते. स्पर्धेच्या या डिजीटल युगात विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या मदतीने अभ्यासातील संदर्भ व इतर माहिती एका क्लिक वर उपलब्ध व्हावी यासाठी हे टॅब महत्वाचे ठरणार आहे. इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डाटा सीमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात JEE / NEET/MHT-CET प्रशिक्षणाकरीता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 893 टॅब व डाटा सीम वाटपाकरीता टॅब व डाटा सीम वितरित करण्यात आले.

टॅब वाटपापूर्वी विद्यार्थ्यांनी आधारकार्ड/ ओळखपत्र, पालकाचे आधारकार्ड/ ओळखपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, 10 वी चे गुणपत्रक, बोनाफाईड प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली.

Facebook    Twitter      
  Print


News - Bhandara | Posted : 2023-03-21
Related Photos