महत्वाच्या बातम्या

 महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारचे फार मोठे योगदान : इंजि. प्रमोद पिपरे


- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत स्थानिक संविधान चौक येथे भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविले जात आहे. देशाचे प्रधानमंत्री, नरेंद्र मोदी व राज्य सरकारने महिलांना लोकसभा, विधानसभेत प्रतीनीधित्व देणारा निर्णय, मुस्लिम महिलांना त्रिपल तलाक पासुन सुटका देणारा निर्णय, सैनीक शाळेत मुलीना प्रवेश, १० करोड गरीब महिलांना मोफत. गँस, घरकुल, शौचालय, किसान सन्मान योजनेचा लाभ, २४ कोटी गरीब महिलांचे मोफत जनधन बँक खाते, लेक लाडकी योजना, एसटी मध्ये प्रवास करतांना अर्धी तिकीट, महिला बचत गटांना विनातारण कर्ज अशा अनेक विविध योजना महिलांच्या विकासा करीता अमलात आणीत आहेत. म्हणून महिला सक्षमीकरनासाठी केंद्र व राज्य सरकारचे फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन लोकसभा समनव्ययक इंजि. प्रमोद पिपरे यांनी केले.

नगरपरिषद गडचिरोली यांच्या वतीने स्थानिक संविधान चौक परिसरात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाला मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, किसान आघाडी प्रदेश सचिव रमेश भुरसे, शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हाप्रमुख अमिता मडावी, तहसीलदार गणवीर, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, माजी न.प. सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेवक केशव निंबोळ, माजी नगरसेविका लता लाटकर, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, श्रीदेवी वरगरंटीवार, अश्विनी भांडेकर, शारदा दामले, वसंत गावतुरे, नितेश बोमन्नवार तसेच मोठया संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध योजनांचे स्टॉल लावलेले होते. विविध योजना अंतर्गत १५३४ महिलांना ७१२६ लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धा, समूह नृत्य, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

संचालन संध्या चिलमवार तर आभार गणेश ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos