युवकांनी आव्हानांना सामोरे जाऊन यश संपादन करण्याची इच्छाशक्ती निर्माण करा : प्रा. अमरदीप मेश्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : सध्याचे जग हे स्पर्धेचे जग आहे. यात युवकांना आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल आणि यश यश संपादन करायचे असेल तर युवकांनी आव्हानाना सामोरे जाण्याची इच्छाशक्ती निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. अमरदिप मेश्राम यांनी केले.
ते गजानन नगर इथे तुषार बाबुराव कवडो यांची SRPF मध्ये निवड झाल्याबद्दल आयोजित सन्मान सोहळ्यात अधक्ष्यपदावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानी सामाजिक कार्यकर्ते महेश ताटकर, मीनाक्षी गेडाम, विशाल दामपल्लीवार, सिताराम गेडाम, सुनील जुआरे, जगदीश चाटारे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानवरून बोलताना सर्वांनी तुषार कवडो याला भरभरून शुभेच्छा दिल्या,आणि त्याच्या मेहनतीचं चीज झाल्याचं भावूक उदगार केले.
कार्यक्रमाला रुपेश जुआरे, अंकुश जुआरे, सागर जुआरे, सुरेश खरकाटे, बालाजी सोनटक्के, राजेश मून, निखील सोनटक्के, मोहित गेडाम, गजानन सोनटक्के, श्यामकांत जूआरे, माधुरी, जुआरे, रीटा जुआरे, स्वना जुआरें, कुसुम जूआरे, नंदा अतकरे, कुसुम जुआरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा गरमळे यांनी केले तर आभार आशिष मने यांनी मानले.
News - Gadchiroli