महत्वाच्या बातम्या

 गांधीनगरच्या उपसरपंचपदी नेताजी सोंदरकर यांची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या गांधीनगर ग्रामपंचायतीची सरपंचासहित सदस्यांची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. आता ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली होती. दरम्यान नवनियुक्त सदस्यांमधून नेताजी सोंदरकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्यानंतर उपस्थित गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना धाकडे तसेच नवनियुक्त सदस्य चक्रधर बनकर, रामचंद्र नखाते, वैभव मेश्राम, सदस्य शालू ढवळे, करिष्मा सोंदरकर, वर्षा चंडीकार, वैष्णवी दोनाडकर, अलका मोहुर्ले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश आदे यांनी नेताजी सोंदरकर यांचे कौतुक केले.

Facebook    Twitter      
  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-11-14
Related Photos