राहत्या घरी गळफास घेऊन युवतीची आत्महत्या : वरोरा येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : शहरा नजीकच्या सीएमपीडीआय परिसरात राहणाऱ्या एका युवतीने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
रजनी अजित शर्मा (24) असे मृतक युवतीचे नाव असून तिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार तिने आधी हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
News - Chandrapur