पत्नीचा गळा आवळून जीवे ठार मारणाऱ्या पतीला आजीवन कारावासाची शिक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : घरगुती कारणावरून वाद विकोपाला गेल्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्या प्रकरणी पतीला कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ०७ डिसेंबर २०१७ ला फिर्यादी सौ. पंचशिला अनिल रामटेके (४५) रा. वार्ड क्र. २१ बोरी यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
०६ डिसेंबर २०१७ ला फिर्यादीची मृतक मुलगी व आरोपी नामे श्याम शिवरोपन नारायण (३२), वार्ड नं. ०१ बुट्टीबोरी हे पति-पत्नी असुन आरोपीने घरगुती कारणावरून आपल्या पत्नीला तिच्या राहते घरात असलेल्या कापडी ओढणीने गळा आवळून खून केला होता. अशा फिर्यादीच्या तोडी रोपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मराठे पोलीस स्टेशन उमरेड यांनी करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठाकरीता कोर्टामध्ये सादर केले. काल ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी कोर्ट विद्यमान न्यायाधीश पास्कर यांना वरील नमुद आरोपाला कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास व ५० हजार रु. दंड, दंड न भरल्यास ०३ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रु. दंड, दंड न भरल्यास ०२ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारच्या वतीने एपीपी फाजी यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार अनिल व्यवहारे पोलीस स्टेशन बोरी यांनी मदत केली आहे.
News - Nagpur