जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक : पोलीस स्टेशन केळवद यांची कारवाई
- एकूण २३ लाख ७५ हजार रू. चा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम ठाणेदार पोलीस स्टेशन केळवद व त्यांचा पोलीस स्टाफ यांनी ०८ मे २०२३ रोजी १०:५० वा. मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरेवरून मौजा बिहाडा फाटा (खापा नरसाळा) येथे नाकाबंदी करीत असताना कथ्या रंगाचा आयसर भरधाव वेगाने पांडुर्गा (एम.पी) कडुन नागपूर रोडने येतांना दिसला. त्यास पंचासमक्ष स्टाफचे मदतीने लाल ट्राफिक लाईटने थांबण्याचा इशारा केला.
सदर वाहन चालक याने आपले ताब्यातील वाहन न थांबवता नागपूरच्या दिशेने पळुन जात होता त्यास स्टाफ व पंचासह पाठलाग करून परत लाल ट्राफिक लाईटने थांबण्याचा इशारा करून सदर वाहन रोडच्या कडेला थांबवुन पंचासमक्ष आयसर गाड़ी क्र. RJ-02 / GC 2669 मध्ये आरोपी १) चालक इलियास खान शेर मोहम्मद (२३) रा. मनक्का, ता. जि अलवर २) आसू मोहम्मद मो. रियाज कुरेशी (३०) रा. हरी, ता. सरदाना जि मेरठ (यूपी) ३) मोहम्मद सयाम बाबू कुरेशी (३०) रा. हरीता सरदाना जि. मेरठ ४) शाहीद खान अयूब खान (२३) रा. पडावना ता. रामगढ जि अलवर (राजस्थान ) ५) शकिल कुरेशी अब्दुल रहमान (३५) रा. हवेली मोहगाव ता सौसर जि. छिंदवाडा (म. प्र) यांनी सदर वाहनाच्या मागच्या डाल्यामध्ये १) २२ नग गोवंश प्रती किमती १५ हजार रु. प्रमाणे एकुण ३ लाख ३० हजार रू. २) ०३ नग बैल गोवंश प्रत्येकी किमती १५ हजार रु. प्रमाणे एकुण किंमती ४५ हजार रु. ३) ०२ नग मृतक बैल गोवंश किंमती ००/०० रू. जनावरे यांना अत्यंत क्रुर व निर्दयतेने डांबुन आखुड दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुल्या जागेत कोंबुन असल्याचे दिसले. आरोपीताच्या ताब्यातून आयसर क्र. RJ-02 / GC-2669 किंमती अंदाजे २० लाख रु. व वाहनाचे मागील डाल्यामध्ये १) २२ नग गोवंश प्रती किंमती अंदाजे १५ हजार रु. प्रमाणे किंमती अंदाजे एकुण ३ लाख ३० हजार रु. २) ०३ नग बैल गोवंश प्रत्येकी किमती १५ हजार रु. प्रमाणे एकुण किमती ४५ हजार रु. ३०२ नग मृतक बैल गोवंश किमती ०००० रू. चे गोवंश असा एकुण वाहनासह २३ लाख ७५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर ०५ आरोपीतांविरूद्ध कलम २७९, ४२९, ३४ भा.द.वि. सहकलम ११ (१) (घ) (ड) (च) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अधि. १९६० सहकलम ५ (अ) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम १९९५ सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन २२ नग गोवंश ०३ नग बैल गोवंश ०२ नग मृत बैल गोवंश जनावरे पुढील देखभाल व्यवस्थेकरीता जय श्रीकृष्ण गौरक्षण गौशाळा गोडेगाव ता. नरखेड येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही विशाल आनंद, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामिण, डॉ. संदिप पखाले अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामिण, अजय चादखेडे उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केळवद येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमरदीप कामठे, सहायक फौजदार किशोर ठाकरे, चालक पोलीस हवालदार गुणवंता डाखोळे, पोलीस नायक दीपक इंगळे, पोलीस शिपाई धोंडुतात्या देवकते, सचिन येळकर यांनी केली आहे.
News - Nagpur