महत्वाच्या बातम्या

 नागपूर पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर : जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक मंगळवार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ६ ऑक्टोबर असून, बुधवार ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख शुक्रवार ९ ऑक्टोबर आहे. शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत मतदान होणार असून मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पार पाडण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष तसेच सर्व विभाग प्रमुखांची पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.





  Print






Related Photos