सूर्यापली येथील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाणून घेतली समस्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील ग्राम कार्यालय राजाराम अंतर्गत येणाऱ्या सूर्यापली येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले. यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या, गली रस्ते, नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केले. सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले. असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी उपस्थित राजाराम ग्राम पंचायतचे सरपंच नागेश कन्नाके, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, उपसरपंचा सुरक्षा आकदर, ग्राम पंचायत सदस्य नारायण कम्बगौनिवार, अँड. एच.के. आकदर, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्राम पंचायत सदस्या सपना तलांडे, माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी ग्राम पंचायत सदस्या महेश्वरी बत्तुलवार, सुखदेव आलाम, तिरुपती आत्राम, महेंद्र सिडाम, शामराव आलाम, तुळशीराम पोरतेट, स्वामी आत्राम, उमेश आलाम, राकेश सड़मेक, सुरेश सोयाम, रुपेश आत्राम, दिपक आलाम व गावातील महिला, युवक नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli