देवसुर ते कटेझरी मार्गांवर दुचाकी अपघातात अज्ञात इसमाचा मृत्यू
- इसमाचे ओळख पटत नसल्याने पोलिसांकडून ओळख पटविण्याचा कार्य सुरू तर ओळख पटल्यास नागरिकांनी कोरची पोलीस स्टेशनला माहिती द्यावी
- पोलीस निरीक्षक अमोल फळतरे यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : तालुक्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रा अंतर्गत येत असलेल्या देवसुर ते कटेझरी मार्गावर ७ जानेवारी रोज शनिवारला अज्ञात इसमाचे नवीन दुचाकीने अपघात होऊन मृतावस्थेत शव आढळले. या अज्ञात इसमाचे अजूनही ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटविण्याचे कार्य कोरची पोलिसांकडून सुरू आहे. तसेच या अनोळखी इसमाची ओळख पटल्यास कोरची पोलीस स्टेशनला पोनि अमोल फळतरे मो.07057183610, ग्यारपत्ती पोउपनि वाडेकर मो.09821181296 यांना फोन करून माहिती देण्याचा आवाहन येथील पोलीस निरीक्षक अमोल फळतरे यांनी तालुक्यातील नागरिकांना केला आहे.
सदर अनोळखी इसमाच्या बॉडीजवळ नवीन होंडा एस पी 125 कंपनीची मोटारसायकल असून तिला नंबर नाही तसेच मोटरसायकलला चेचीस नंबर तपासले असता ते सुद्धा बरोबर दिसत नाही, या अज्ञात इसमाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून याचा रंग सावळा, उंची पाच फूट 10 इंच, बांधा- मजबूत, अंगात हिरव्या रंगाच्या चेक शर्ट, ग्रे व लाल रंगाच्या जर्किंग तसेच सिमेंट रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला होता.
या अनोळखी इसमाची ओळख पटत नसल्याने ग्यारापत्ती पोलिसांनी मर्ग दाखल करून कोरची पोलिसांना याबाबद माहिती दिली यानंतर या इसमाची बॉडी पोलिसांनी कोरची ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ आशिष विटनकर यांनी तपासून रविवारी पोस्टमार्टेम केला.
तसेच कोरची पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी या अज्ञात इसमाच्या बॉडीला गडचिरोली येथील शविच्छेदन कक्षात पाठविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाडेकर हे करित आहेत.
News - Gadchiroli