जिल्हा परिषदेत दिव्यांगांना मिळणार शासकीय नौकरीची संधी


- दिव्यांगांसाठी एकंदरीत ९ पदांची केली निश्चिती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील तज्ञ समितीच्या दिनांक ७ जुलै २०२१ रोजीच्या इतिवृत्तानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ३३ नुसार दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील विविध पदे निश्चित करण्यात आले असून यापुढे उच्च शिक्षण घेतलेल्या विविध प्रवर्गातील दिव्यांगांनाही जिल्हा परिषदेत शासकीय नोकरीची संधी मिळणार आहे. 
दिव्यांग हक्क अधिनियमानुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक (कंत्राटी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा एकूण ७ संवर्गातील पदे ग्रामविकास विभागाच्या वतीने 13 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयान्वये दिव्यांगासाठीच्या नवीन प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली आहेत. 
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६  मधील कलम ३३ नुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदांची पदसुनिश्चिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी ०४  जानेवारी २०२१ काढलेल्या अधिसूचनेन्वये दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी प्रसिद्ध केली आहे.  केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जिल्हा परिषदेकडील गट- क व ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाचे उप आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने केंद्र शासनाच्या ०४ जानेवारी २०२१ च्या अधिसूचनेमधील पदांची पडताळणी करून जिल्हा परिषदेकडील भरती योग्य पदांसाठी केंद्र शासनाच्या अधिसूचनेमधिल सर्वसाधारणपणे समकक्ष आढळून येणार्‍या जिल्हा परिषदेकडील पदांकरिता दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करून अहवाल सादर केला आहे. समितीने सादर केलेला अहवाल तसेच केंद्र शासनाच्या दिनांक अधिसूचनेत समक्ष पदांशी पडताळणी करून जिल्हा परिषदेकडे गट क संवर्गातील विस्तार अधिकारी (सांख्यिकी), कनिष्ठ लेखाधिकारी अशी एकूण २ पदे या शासन निर्णयान्वये दिव्यांगांसाठी च्या नवीन प्रवर्गासह सुनिश्चित करण्यात येत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत एकूण ९ पदावर दिव्यांगांना नोकरीची संधी मिळणार आहे. दिव्यांगांच्या विविध प्रकारचा समावेश आहे
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-14


Related Photos