विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गडचिरोली : महिलांचा समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशानेजिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. समस्याग्रस्त व पिडीतमहिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या हेतुने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकमहिन्याचा तिसरा सोमवार महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. महिलांचा कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी,


- ऑनलाइन सीईईमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना सहभागी होता येणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सेना भरती कार्यालय, नागपूर यांच्या वतीने ऑनलाइन कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन (CEE) मध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांसाठी भारतीय सेना अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती रॅली ३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तालुका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विसापूर, जिल्हा चंद्रपूर येथे होणार आहे.
या भरती रॅलीत महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांना विविध प्रवर्गांत सहभागी होता येणार आहे. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स), अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल (ऑल आर्म्स), अग्निवीर ट्रेड्समन (१० वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर ट्रेड्समन (८ वी उत्तीर्ण) या प्रवर्गांचा समावेश आहे.
तसेच अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल (ऑल आर्म्स) या प्रवर्गासाठीही याच ठिकाणी स्वतंत्र भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांसह दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव केंद्रशासित प्रदेशातील पात्र उमेदवार सहभागी होऊ शकतील.
ऑनलाइन सीईईमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या लॉग-इन तपशीलाचा वापर करून रॅली प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रत्येक उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर त्याची रिपोर्टिंगची तारीख, वेळ आणि ठिकाण नमूद केलेले असेल.




Petrol Price




