महत्वाच्या बातम्या

 डॉ. पं.दे. कृ. वि. अकोला येथे शिवार फेरी आणि थेट पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा : डॉ. उषा डोंगरवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जागतिक हवामान बदलाच्या परिस्थितीत शाश्वत शेती व संपन्न शेतकरी संकल्पना जोपासत वैश्विक पटलावर सर्वाधिक लोकसंख्यांक होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील जनतेला दोन वेळचे सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठीचे शेतकरी बंधू भगिनींना कालसुसंगत आधुनिक शेती तंत्रज्ञाना सोबतच शेती पूरक जोडधंदे, गावपातळीवर करता येणारे शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी संबंधी माहिती मिळावी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा सोबतच इतरही सलग्न संस्थाद्वारे निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे व शास्त्रज्ञासोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका समाधान करता यावे, या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे.

रविवार २० सप्टेंबर ते मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले असून या तीन दिवसीय शिवार फेरीसाठी नोंदणी शुक्रवार २० सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता पासून करण्यात येणार आहे. नोंदणी नंतर २० हूनही अधिक विविध प्रक्षेत्र व संशोधन विभागाना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध करण्यात झाली आहे.

शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना खरीप हंगामातील जवळपास सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे या हेतूने गहू संशोधन विभागाचे प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवाना पाहण्यासाठी एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये  विविध पिकांच्या जाती लावण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया,कडधान्य, तृनधान्य,कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती येथे लावण्यात आलेले आहेत.

तसेच विद्यापीठाचे महत्वाचे शिफारशीचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. या शिवार फेरीचे निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आपल्या शेतीविषयक समस्यांचे तज्ञांकडून वेळीच निराकरण करण्याची ही सुवर्णसंधीच उपलब्ध होणार आहे.

तरी गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, पुरुष व महिला शेतकरी, बचत गट, उत्पादक कंपनी उद्योजक यांनी या शिवार फेरीस भेट द्यावी व उपस्थित रहावे व आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे असे आवाहन सहयोगी प्राध्यापक, डॉ. उषा डोंगरवार कृषि संशोधन केंद्र नवेगाव बांध तर्फे करण्यात आले आहे.





  Print






Related Photos