राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात : आशिष शेलारांचे मोठे विधान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे :
'महाविकास आघाडी सरकारमधील ३ पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे. २  पक्षाचे संकेत जे आमच्याकडे येत आहेत. त्यावरून राज्यात निवडणूक केव्हाही लागू शकते असे सूतोवाच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेआहे.
महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याबद्दल भाजपच्या नेत्यांनी वारंवार मुहूर्त देत अनेक दावे केले आहे. पण, आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता थेट मध्यावर्ती निवडणुकीचे संकेत दिले आहे.  मावळमध्ये भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आशिष शेलार बोलत होते.
राज्यातील सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ३ पक्षामध्ये विसंवादाची लढाई लागली आहे. २ पक्षाचे संकेत जे आमच्याकडे येत आहेत. त्यावरून राज्यात निवडणूक केंव्हाही लागू शकते, असा दावाच आशिष शेलार यांनी केला आहे.
'राज्यात असलेला सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगेबाज असलेलं सरकार आहे. राष्ट्रवादी हा घोटाळेबाज, काँग्रेस हा झोलबाज आणि शिवसेना हा दगाबाज असे हे तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेनेने मोदींचा फोटो वापरून निवणुकीत यश मिळवलं तर निवडणूक झाल्यानंतर दगेबाजी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष दगेबाजच असणार आहे, अशी टीकाही आशिष शेलारांनी केली.  Print


News - Rajy | Posted : 2021-10-01
Related Photos