विनयभन्ग प्रकरणी उन्दरणी येथील रमेश गावन्डे यास १ वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये द्रव्यदन्ड


- घाटन्जी येथील प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी प्रविण पाटील यांचे आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील उन्दरणी येथील आरोपी रमेश तुकाराम गावन्डे (वय ४२) यांस घाटन्जी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी प्रविण पाटील यांनी विनयभंग प्रकरणात १ वरषाची शिक्षा व ५ हजार रुपये द्रव्यदन्ड ठोठावला. सदर प्रकरणात शासनाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड. डी. पी. बोरसे यांनी मान्डली. तर आरोपी रमेश गावन्डे यांचे तर्फे ऍड. अनन्तकुमार पान्डे यांनी काम पाहीले.
घाटन्जी तालुक्यातील उन्दरणी येथील पिडीता ही ६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या शेतात कापुस वेचण्याकरीता गेली होती. सायंकाळी ४.३० ते ४.४५ दरम्यान आरोपी रमेश तुकाराम गावन्डे हा पिडीतेच्या शेतात आला व तिला म्हणू लागला, शेतात तु एकटीच आहे का? तेव्हा, पिडीतेने हो असे उत्तर दिले. तेव्हा आरोपी रमेश तुकाराम गावन्डे याने पिडीतेच्या खान्द्यावर हात ठेवला व कम्बर पकडून पिडीतेला उचलले. तेव्हा, पिडीतेने भाऊ हे तुला शोभते का? असे विचारले असता, आरोपी रमेश गावन्डे हा शेतातून निघून गेला.
त्यामुळे पिडीता ही घाबरुन गेली व आरडा ओरड करु लागली. अशा पिडीतेच्या तोंडी बयाना वरुन अपराध क्रमान्क ५३५/२०२१ अन्वये घाटन्जी पोलीस ठाण्यात भारतीय दन्ड विधान कलम ३५४ अन्तर्गत विनयभन्गाचा गुन्हा नोन्दविण्यात आला.
सदर प्रकरणाचा तपास जमादार प्रदीप मेसरे यांनी करुन घाटन्जी येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणाची सुनावणी होऊन शनिवार २९ ऑगस्ट २०२६ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायाधिश प्रविण पाटील यांनी आरोपी रमेश तुकाराम गावन्डे यांस एक वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दन्ड ठोठावला.
सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड. डी. पी. बोरसे यांनी मान्डली. पैरवी अधिकारी म्हणून सन्तोष मारबते यांनी त्यान्ना सहकार्य केले.




Petrol Price




