क्रिकेट स्पर्धा हि खेळीमेळीच्या वातावरणात व्हायला पाहिजे : भाग्यवान खोब्रागडे यांचे प्रतिपादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : २४ नोव्हेंबर गुरवारला नवीन ठाणेगाव येथील क्रीडांगणावर विर शिवाजी क्रिकेट मंडळाच्या वतीने रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना खोब्रागडे यांनी बाहेरून आलेल्या संघावर द्वेष भावना व अन्याय व्हायला नको. पंचांच्या व मंडळाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता असावी जेणेकरून गावाचे व मंडळाचे नावलौकिक होईल. खेळामुळे शरीराचा विकास होतो तर अभ्यासामुळे बुद्धीचा विकास होतो असे प्रतिपादन केले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेगावचे माजी उपसरपंच लाला कुकडकार, लिसीट हायस्कूल आश्रमशाळेचे अधीक्षक स्पार्टाकास शेंडे, तिवाडे सर, उमेश मसराम, राजु नैताम, चंदु नैताम, विलास मेश्राम, कालीदास मेश्राम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश किरमे यांनी केले.
News - Gadchiroli