उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ :
  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज काल शनिवार वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. लखनऊ मधील एसजीपीजीआयमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती.
दोन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले होते. जेव्हापासून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती.
कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपाचे एक प्रमुख नेते होते.
”कल्याण सिंह यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाईल. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी नरोरो येथे गंगा नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसेच, २३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल.” असे  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.



  Print






News - World | Posted : 2021-08-22




Related Photos