महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२० ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१९०४ : चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.

१९४७ : अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९५० : कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.

१९५२ : केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

१९६२ : चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.

१९६९ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.

१९७० : हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

१९७१ : मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

१९७३ : सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

१९९१ : उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

१९९५ : ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.

२००१ : रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.

२०११ : लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

२० ऑक्टोबर जन्म

१८५५ : गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)

१८९: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९७४)

१८९३ : केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)

१९१६ : लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)

१९२० : भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर २०१०)

१९२७ : भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)

१९६३ : क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.

१९७८ : भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.

१९२३ : भारतीय ध्रुपद गायक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचा जन्म (मृत्यू : २८ डिसेंबर २०००)

२० ऑक्टोबर मृत्यू

१८९० : ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १८२१)

१९६१ : मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन.

१९६४ : अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८७४)

१९७४ : प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८९८)

१९८४ : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)

१९९६ : पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचे निधन.

१९९९ : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन.

२००९ : गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)

२०१० : क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४८)

२०११ : लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचे निधन. (जन्म: ७ जून १९४२)

२०१२ : पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९१५)

२०१५ : भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री सय्यद जहूर कासिम यांचे निधन (जन्म: ३१ डिसेंबर १९२६)

२०१० : पाकिस्तानचे ८ वे राष्ट्रपती फारूख लेघारी यांचे निधन (जन्म: २९ मे १९४०)

१९५६ : अमेरिकन उद्योगपती, बेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक लॉरेन्स डेल बेल यांचे निधन (जन्म: ५ एप्रिल १८९४)





  Print






Related Photos