महत्वाच्या बातम्या

 सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन


- एआयएसएसईई-२०२७ प्रवेश परीक्षेसाठी २ डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच इतर नागरिकांनी आपल्या पाल्यांच्या सैनिक शाळेतील प्रवेशाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सैनिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी एआयएसएसईई-२०२७ साठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ असून, प्रवेश परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन सैनिक शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळवावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मोरे यांनी केले आहे.





  Print






Related Photos