महत्वाच्या बातम्या

 सोनापूर येथे सिलिंडरचा भीषण स्फोट : सोमणकर


- घटनेची माहिती मिळताच माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची घटनास्थळी धाव , पाहणी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, जखमींच्या उपचारांची घेतली माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील सोनापूर येथे कालरविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बंडू सोमणकर यांचे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, फर्निचर व इतर वस्तू जळून खाक झाल्या.अचानक आलेल्या या संकटामुळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.या दुर्घटनेत घरातील दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ सोनापूर येथे धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. आगीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सोमणकर कुटुंबीयांशी संवाद साधला. तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करून संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

माणुसकीच्या नात्याने पीडित कुटुंबाच्या मदतीला धाव -
दुर्घटनेचे वृत्त समजताच कोणताही राजकीय भेद न ठेवता माणुसकीच्या नात्याने डॉ. अशोकजी नेते यांनी घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आर्थिक मदत केली, तसेच जखमींच्या वैद्यकीय उपचारांची माहिती घेतली. संकटाच्या काळात तत्काळ मदतीचा हात देत कुटुंबीयांना मानसिक आधार दिल्याबद्दल परिसरातून त्यांच्या संवेदनशील भूमिकेचे कौतुक होत आहे.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष अविनाश पाल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, भाजपा तालुका महामंत्री सचिन तंगडपल्लीवार, सावलीचे ठाणेदार पुल्लुरवार साहेब, नायब तहसीलदार मडावी साहेब, मुसळे साहेब, ज्येष्ठ नेते प्रकाश नागापुरे, डोनाळाचे उपसरपंच जितू सोनटक्के, सोनापूरचे उपसरपंच मुकेश भुरसे आणि युवा नेते सूरज किनेकर यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

गॅस वापरताना नागरिकांनी दक्षता बाळगावी -

डॉ. अशोक नेते यावेळी नागरिकांना आवाहन करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, गॅस गळतीचा वास आल्यास तात्काळ रेग्युलेटर बंद करावा. घरातील विद्युत उपकरणे किंवा स्विच सुरू अथवा बंद करू नयेत. दरवाजे व खिडक्या उघडून घरातील गॅस बाहेर जाण्यासाठी हवा खेळती ठेवावी. तसेच गॅस पाईप, रेग्युलेटर व सिलिंडरची वेळोवेळी तपासणी करून सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दरम्यान, प्रशासनाकडून या दुर्घटनेतील नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, पीडित सोमणकर कुटुंबाला शासकीय स्तरावरून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





  Print






Related Photos