आणखी एका हवाई हल्ल्याने उडवली काबुलची झोप, पहाटेच विमानतळावर तोफांचा मारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / काबूल :
अफगाणिस्तानमध्ये तलिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून रोज धक्कादायक बातम्या समोर येत आहे. सध्या काबूल विमानतळाजवळ सतत बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत. आज सोमवारी सकाळी काबूल पुन्हा रॉकेट हल्ल्याने हादरले आहेत. आता याठिकाणी अनेक  रॉकेट हल्ले झाल्याची माहिती  मिळत आहे. हवाई हल्ला आहे किंवा बॉम्बस्फोट याची अद्याप पुष्टी केलेली नाही. आता काबूलमध्ये चार ठिकाणी हल्ले झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एका वृत्तसंस्थेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काबूलमध्ये अनेक रॉकेटचे आवाज ऐकायला आहे. पण या हल्ल्यामागे त्यांचे लक्ष्य काय आहे हे स्पष्ट झाले नाही. सद्यस्थिती पाहाता आफगाणिस्तानमध्ये अत्यंत चिंचाजनक परिस्थिती आहे. या हल्ल्याआधी देखील काबूल विमानतळावर प्राणघातक हल्ले झाले.   Print


News - World | Posted : 2021-08-30
Related Photos