महत्वाच्या बातम्या

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदी आवश्यक सुविधेसाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या सन २०२६-२७ मधील अर्जांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत असलेली मुदत वाढविण्यात यावी याबाबत मागणी होत असल्यामुळे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थी वंचित राहु नये, यासाठी मागील वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन अर्ज Renew करणेकरीता सदर योजनेअंतर्गत अर्ज

स्वीकारण्याची मुदत आता दिनांक ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२६-२७  मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा पात्र लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीकरीता सहाय्य आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.





  Print






Related Photos