गडचिरोली जिल्ह्यात आज २ नव्या कोरोना बाधितांची नोंद


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज गडचिरोली जिल्हयात ७९५ कोरोना तपासण्यांपैकी ०२ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज कोरोनामुक्त संख्या शुन्य आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३०७०३ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९९२५ आहे.तसेच सद्या ३२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७४६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४७ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.१० टक्के तर मृत्यू दर २.४३ टक्के झाला.
नवीन ०२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ००, अहेरी तालुक्यातील ००, आरमोरी ००, भामरागड तालुक्यातील ००, चामोर्शी तालुक्यातील ००, धानोरा तालुक्यातील ००, एटापल्ली तालुक्यातील ०१, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ००, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ०१, कोरची तालुक्यातील ००, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ००, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ००जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ००रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ००, अहेरी ००,  आरमोरी ००, भामरागड ००, चामोर्शी ००, धानोरा ००, एटापल्ली ००, मुलचेरा ००, सिरोंचा ००, कोरची ००, कुरखेडा ०० तसेच वडसा येथील ०० जणांचा समावेश आहे.




  Print






News - Gadchiroli | Posted : 2021-08-29



Related Photos