चंद्रपूर : अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची पुण्यातून सुखरूप सुटका करण्यास यश, चौघांना अटक


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील वरोरा येथून २ अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार मुलींच्या पालकांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे दिली होती. याबाबत पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे शोध घेतला असता बाभूळगाव येथीलही अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याचे कळले. व या तीनही मुलींना पुण्यात नेले असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी पुणे गाठून तीनही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका केली असून याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्य़ातील राळेगाव चार आरोपींना अटक केली आहे. रोहित सन्गिले, शुभम मानेकर, प्रमोद सोनवणे, प्रक्षित भोयर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. 
प्राप्त माहितीनुसार २७ सप्टेंबर रोजी वरोरा येथील २ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या व २८ सप्टेंबर रोजी मुलींच्या पालकांनी वरोरा पोलीस ठाण्यात  फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. वरोरा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असत सापडून आले नाही. पोलिसांनी आपल्या तपासाचे चक्र अधिक जलद गतीने फिरविले असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ४ पथक तयार केले त्यातील चारही पथक मिळालेला माहिती च्या आधारे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे गेले. दरम्यान तेथे त्यांना त्याच गावातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. या तीनही मुलींना आरोपींनी  पुण्यात नेले असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि माहिती च्या आधारे पोलिसांनी पुणे गाठून मुलींची सुखरूप सुटका केली आहे. याबाबत चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2021-10-01
Related Photos