काबुलमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / काबूल :
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर तिथली परिस्थिती चिघळत चालली आहे. तालिबान आणि दहशतवाद हे समीकरण असल्याने अनेक देशांनी चिंता व्यक्त केली. आता अफगाणिस्तानात युक्रेनच्या विमानाचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. युक्रेनचे विमान आपल्या नागरिकांना आणण्यासाठी अफगाणिस्तानात गेले होते. या दरम्यान विमानाचं अपहरण झाल्याचा दावा युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. रशियाची वृत्तसंस्था TASS ने याबाबतचे वृत्त दिले आहे. विमान हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरिकांना घेण्यासाठी उतरले होते आणि तिथून इराणसाठी उड्डाण केले होते.
गेल्या रविवारी अज्ञात लोकांनी विमान अपहरण केले होते, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री येवगेनी येसेनिन यांनी रशियन वृत्तसंस्था TASS ला सांगितले. युक्रेनियन लोकांबरोबर उड्डाण करण्याऐवजी, काही अज्ञात लोक त्यात चढले आणि इराणच्या दिशेने उड्डाण केले. यामुळे आमचे तीन एअरलिफ्टचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आमचे लोक विमानतळावरच पोहोचू शकत नाहीत, असे त्यांनी पुढे सांगितले.
  Print


News - World | Posted : 2021-08-24


Related Photos