महत्वाच्या बातम्या

 पोलीस हवालदार महेश शिवरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोठारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश शिवरकर (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे पोलीस विभागासह त्यांच्या परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण करून ते झोपले होते. दरम्यान, त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याकरिता नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

महेश शिवरकर हे चंद्रपूर येथील नगीना बाग परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १२ वर्षीय मुलगा आणि आप्तपरिवार असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक निधनाने परिसरात शोककळा पसरली असून पोलीस विभागातूनही दुःख व्यक्त केले जात आहे.





  Print






Related Photos