मे महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद : सुट्ट्यांची यादी जाहीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास, डिमांड ड्राफ्ट इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. जर बँकेतील काही महत्त्वाचे काम मे महिन्यात पूर्ण करायचे असेल तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणे गरजेचे आहे.
मे महिन्यात १२ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मे महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या कॅलेंडरनुसार मे महिन्यात एकूण १२ दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय ३ आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.
सुट्ट्यांची संपूर्ण यादी -
१ मे २०२३ : महाराष्ट्र दिन. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, बंगाल, गोवा आणि बिहारमध्ये बँका बंद राहतील.
५ मे २०२३ : बुद्ध पौर्णिमा. त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
७ मे २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
९ मे २०२३ : रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिनानिमित्त बंगालमध्ये बँका बंद राहतील.
१३ मे २०२३ : महिन्याचा दुसरा शनिवार
१४ मे २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१६ मे २०२३ : राज्य दिन- सिक्कीम
२१ मे २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२२ मे २०२३ : महाराणा प्रताप जयंती. हिमाचल प्रदेश, शिमला येथे बँका बंद राहतील.
२४ मे २०२३ : त्रिपुरामध्ये काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
२७ मे २०२३ : महिन्याचा चौथा शनिवार
२८ मे २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
News - Rajy