नागपूर जिल्ह्यात जि. प. मार्फत विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन
- मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांची शिबिराला भेट
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जि. प. मार्फत जिल्ह्यात आज विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात प्रातिनिधिक स्वरूपात कामठी तालुक्यातील महालगाव येथील आरोग्य शिबिराला जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या सुचनेनुसार व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असांसर्गिक आजारांवरील शिबिराचे जिल्हाभरात आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील विविध गावांचा समावेश आहे. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, तीन प्रकारचे कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय) यांची प्राथमिक स्वरूपात तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल सकारात्मक आल्यास पुढील तपासण्या करण्यात येणार आहे. येत्या काळात विविध सामाजिक संस्था आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयासह विविध ठिकाणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
News - Nagpur