परीक्षा पे चर्चा पर्व-६ उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
- पंचायत समिती, मुलचेरा अंतर्गत आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : २५ जानेवारी २०२३ ला परीक्षा पे चर्चा पर्व ६ उपक्रमांतर्गत गट साधन केंद्र, मुलचेरा पंचायत समिती, मुलचेरा अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेरा य भगवंतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा लगाम येथे करण्यात आले. सदर चित्रकला स्पर्धेत इयत्ता ९ वी ते १२ वी तील एकुण २४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले. शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेरा येथे सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेराचे प्राचार्य प्रल्हाद बी. मंडल तर कार्यक्रमाचे उदघाटक तथा परीक्षा पे चर्चा पर्व - ६उपक्रमाचे तालुका नोडल अधिकारी म्हणुन गौतम एम. मेश्राम गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मुलचेरा हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विलास एन. श्रीकोंडावार गटसमन्वयक, गट साधन केंद्र, मुलचेरा, प्रकाश एम. माकोडे केंद्र प्रमुख, सुंदरनगर व मुलेचरा उपक्रमप्रमुख अमर एस. पालारपवार, विषय साधन व्यक्ती व गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी, मुल्यांकन समितीचे सर्व सदस्य, फुलोरा सुलभक, शाळेतील शिक्षक वृंद हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या नंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. परीक्षा पे चर्चा पर्व ६ उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उपक्रमाचे प्रस्ताविका अमर एस. पालारपवार यांनी केले. गौतम एम. मेश्राम गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी, मुलचेरा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा व स्पर्धेतील विषयाची माहिती आपल्या संबोधनातून दिले . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद मंडल यांनी या स्पर्धा साधारण नसून राष्ट्रीय स्तरावरील आहेत असे सांगितले. सदर स्पर्धेत शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेरा येथे १३९ तर भगवंतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, लगाम येथे १०६ असे एकूण तालुक्यातील २२ माध्यमिक शाळेतील २४५ विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त सहभाग घेतले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक किर्तना चिन्नमारया मुडीमंडीगेला, शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेरा द्वितीय क्र. युवराज गोपाल कविराज, शहिद बिरसामुंडा उच्च माद्यमिक आश्रम शाळा, लगाम व तृतीय क्र. कु. पल्लवी विश्वजीत सरकार शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेराच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला. प्रथम क्रमांकास रु. ५००, द्वितीय क्रमांकास रु. ३०० तर तृतीय क्रमांकास रु. २०० असे पारितोषिक प्रदान करण्यात आले व क्रमानुसार उत्कृष्ट २५ चित्रकलेला प्रोत्साहनपर सहभागीतेचे प्रमाणपत्र देण्यात आले.
परीक्षा पे चर्चा पर्व ६ उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा अंतर्गत पर्यवेक्षक व मूल्यमापन समिती म्हणून गटसाधन केंद्रातील ७ कर्मचारी, तालुका फुलोरा सुलभक ३ शिक्षक ६ व मुल्यमापन समिती ७ असे एकुण २३ अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे अहवाल लेखन अशफाक शेख, साधन व्यक्ती गटसाधन केंद्र, मुलेचरा यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli