अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
- काँग्रेस नेते व माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या तर्फे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुक प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोंकापरी येथील जय पेरसापेन व्हाॅलीबाॅल मंडळ कोंकापरी द्वारा भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी पहिला- दुसरा- तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आले आहे.
आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्यातर्फे विजय संघानां काँग्रेसचे नेते व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली आहे.
यावेळी बक्षीस वितरण करतांना तंटामुक्ती अध्यक्ष मुताजी पोरतेट, ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट, नर्षिम्हा मुद्रकोल, भगवान तलांडे, राकेश तलांडे, रुपेश पोरतेट, शारदा पोरतेट, वैशाली तलांडे, सुकृ कोरेत, प्रवीण सोयाम, अविनाश तलांडे, नरेश मुद्रकोल, रामू आवूलवार, विलास पोरतेट, मनोहर पोरतेट, संदीप पोरतेटसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli