महत्वाच्या बातम्या

 नागपुर : पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी एमआयडीसीच्या नवीन बुटीबोरी औद्योगिक परिसराची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नवी दिल्लीतील इंजिनिअर्स इंडिया लि.च्या (ईआयएल) दोन सदस्यीय चमूने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी एमआयडीसीच्या नवीन बुटीबोरी औद्योगिक परिसराची पाहणी केले.

सर्वेक्षणाचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल चार महिन्यांत येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स होणार वा नाही, यावर निर्णय होणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारी वा खासगी यांपैकी कोणती कंपनी पुढाकार घेते, ही बाबही प्रकल्पासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

मिहान वा नागपूर जिल्ह्यांतील औद्योगिक परिसरात रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स एकत्रित आणण्यासाठी वेदचे प्रदीप माहेश्वरी यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी ईआयएलच्या दोन अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणाने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास २ हजार ५०० एकर जागा लागणार आहे.

हिवाळी अधिवेशनात चर्चा

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या मुद्द्यावर नागपुरात हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांच्याशी वेदच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली होती. या प्रकल्पासाठी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ईआयएलचे मुख्य महाव्यवस्थापक अनिल कुमार आणि वरिष्ठ व्यवस्थापक विनित बक्षी या दोन अधिकाऱ्यांचा चमू सर्वेक्षणासाठी आला.

रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स एकत्रित व्हावे

विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स येऊन चालणार नाही तर रिफायनरीसोबत पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पाची उभारणी व्हायला हवी. याकरिता जवाहरलाल नेहरू पोर्टवरून तीन वेगवेगळ्या पाइपलाइनच्या माध्यमातून इथेन, नैसर्गिक गॅस आणि नाफ्ता प्रकल्पात आला पाहिजे. रिफायनरीतून केमिकलची मोठी रेंज आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पात कमी रेंज मिळते.





  Print






News - Nagpur




Related Photos