एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल अहेरी चा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर जुडो स्पर्धेत तृतीय क्रमांक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : गुंटूर, विजयवाडा ( मध्यप्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या EMRS National lavel sports meet २०२२ मध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल अहेरी, येथील विद्यार्थी हरीश दीपक आत्राम वर्ग ८ वा या विद्यार्थाने जुडो अंडर १४ मध्ये ब्राँझ मेडल पटकावले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .
EMRS State Level Sports Meet २०२२ मध्ये जुडो १४ मध्ये गोल्ड मेडल मिळाला. त्यानंतर नॅशनल लेव्हलमध्ये ब्राँझ मेडल मिळवल्या बद्दल शाळेतील प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
News - Gadchiroli