जलसेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत निम्न वर्धा कालवे विभाग व वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने २ ते १७ ऑक्टोंबर या कालावधीत जलसेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नागपूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अनील फरकडे, निम्न वर्धा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शर्मा, कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता प्र.ना.वाकुडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे यांच्या हस्ते पाच नद्याच्या पाण्याच्या जलपुजनाने करण्यात आले. वर्धा पाटबंधारे विभागाच्या सभागृहात आयोजित जलसेवा संकल्प अभियान कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ऑक्सीजन पार्क निसर्ग सेवा समितीचे संस्थापक मुरलीधर बेलखोडे, गोंडवाना विद्यापिठाचे गट समन्वयक निलेश मुंजे यांची उपस्थिती होती.
एकमेकांच्या सहकार्याने पाण्याची बचत कशी होईल, तसेच पाणी बचतीची यशस्वी वाटचाल व कमी पाण्यात जास्त पिके शेतकऱ्यांना कसे घेता येईल त्याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी योग्य पध्दतीने कार्य करीत असल्याचे समाधान अनिल फरकडे यांनी व्यक्त केले. राजेश शर्मा यांनी आपल्या जीवनात पाण्या
मुरलीधर बेलखोडे यांनी पाणी बचत व वृक्षारोपन करुन कसे पाणी जमिनीत पुरवू शकाल व जमिनीतील पाण्याची पातळी कशाप्रकारे वाढेल याबाबत मार्गदर्शन केले. निलेश मुंजे यांनी पाणी बचतीकरीता प्रत्येक घरांच्या बाजुने पुनर्भरण खड्डे करुन छतावरील पाणी कसे मुरवायचे तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पाणी वापर संस्थेमार्फत पाणी कसे पाहोचेल व कमी पाण्यात पिके कसे घेता येईल तसेच पाणी बचतीबाबत कार्य करावे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निम्न वर्धा कालवे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी रा. दि. गायकवाड यांनी जलसेवा संकल्प अभियान कालावधीत कार्यक्षेत्रातील अनेक गावातील शाळेमध्ये जाऊन चित्रकला स्पर्धा, जलदिंडी व वक्तृत्व स्पर्धा व त्याद्वारे पाणी बचतीबाबत अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन दिप्ती सुवाने यांनी केले तर सुनिल गजबे यांनी आभार मानले. तत्पूर्वी जलप्रतिज्ञेचे वाचन करुन उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निम्न वर्धा कालवे विभागातील उपकार्यकारी अभियंता भुजाडे, राहुड, राखुंडे, हिंगोले, नाईक, अश्विनी गायकवाड, मेश्राम, पाटील, पेंदोर,सोनोने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.




Petrol Price




