महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध योजनांची जनजागृती व मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्यामार्फत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये युवक-युवतींसाठी रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेशी संबंधित विविध शासकीय योजना व उपक्रमांची जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत ३० सप्टेंबर २०२६ रोजी नानाजी जोशी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शहापूर तसेच ग्रामविकास हायस्कूल, कोंडी-जवाहरनगर पेट्रोलपंप, भंडारा येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास कार्यालयाच्या वतीने सुहास बोंदरे, अ.पा.आ.मा.वि.म. जि.स.अधिकारी तसेच अतुल पडोळे, जिल्हा समन्वयक CMYKPY यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थी व युवकांना विविध शासकीय योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी सेवायोजन कार्ड वेबपोर्टलवर नाव नोंदणी व नोकरीसाठी सहकार्य, रोजगार मेळावे, अल्प मुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सेवा-सोसायटी नोंदणी, करिअर ग्रंथालय सदृश अभ्यासिका, उद्योजकता विषयक नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच इनक्युबेशन सेंटर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार, कौशल्य विकास, प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगाराच्या संधींचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सदर कार्यक्रमांचे आयोजन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नानाजी जोशी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शहापूर येथे एकूण २३५ विद्यार्थी/विद्यार्थिनी, तर ग्रामविकास हायस्कूल, कोंडी-जवाहरनगर पेट्रोलपंप, भंडारा येथे ११० विद्यार्थी/विद्यार्थिनी उपस्थित होते. अशा प्रकारे दोन्ही कार्यक्रमांना एकूण ३४५ विद्यार्थी/विद्यार्थिनींची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये कौशल्य विकास, रोजगार, प्रशिक्षण व उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.





  Print






Related Photos