फेसबुकची तालिबानच्या विरोधात मोठी कारवाई : तालिबानी नेत्यांसह अनेकांच्या अकाऊंटवर बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
फेसबुकने तालिबानच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. फेसबुकने तालिबान ही अमेरिकेच्या कायद्यानुसार दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालिबानला फेसबुकच्या सेवांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तालिबानची सर्व अकाऊंट हटवली जाणार आहेत. तसेच, तालिबानच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या सर्व अकाऊंटवर बंदी घातली जाईल. फेसबुकच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर फेसबुक तालिबानला प्रोत्साहन देणारी सर्व माहिती काढत आहेत. फेसबुक इंक एक्झिक्युटिव्हने सांगितले की, कंपनी तालिबानला प्रोत्साहन देणारी सामग्री त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सक्रियपणे काढून टाकत आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीकडे दरी आणि पश्तो भाषा तज्ज्ञांची संपूर्ण टीम आहे जी आम्हाला स्थानिक माहितीची देखरेख आणि माहिती देत ​​आहे.
अनेक तालिबानी प्रवक्ते, नेते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत. यापैकी अनेकांचे फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहेत आणि तिथून सातत्याने आपल वक्तव्य करत आहेत. आता फेसबुकने ही कारवाई केल्याने त्यांचे लश्र ट्विटरसह इतर प्लॅटफॉर्मवर असणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यापासून दहशतीचे वातावरण आहे. भीतीमुळे अनेक लोक देशाबाहेर पळून जात आहेत. तर बरेच लोक घरात लपून बसले आहेत. यामुळे देशातील कामकाज ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत आता तालिबानसाठीही अडचणी निर्माण होत आहेत. म्हणूनच आता तालिबान्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत.
  Print


News - World | Posted : 2021-08-17Related Photos